‘करवीर हायकर्स’नी फत्ते केली एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम

कोल्हापूरच्या ‘करवीर हायकर्स’ ग्रुपमधील सात जणांनी अत्यंत प्रतिकूल हवामानात खडतर अशी एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम फत्ते केली. समुद्रसपाटीपासून ५३६४ मीटर उंचीवर पोहोचून त्यांनी अभिमानाने तिरंगा झेंडा फडकवला, तसेच संविधानाची उद्देशिका प्रदर्शित केली. या मोहिमेत रत्नागिरीचे उप-जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया यांचा सहभाग होता.

वीज पडण्याचा धोका समजण्यासाठी दामिनी अॅप

पावसाळ्यात वीज पडण्याचा धोका समजण्यासाठी दामिनी अॅप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्याचा उपयोग नागरिक आणि शेतकऱ्यांनीही करणे आवश्यक आहे.