निरागस सुरांची मैफल आज (१४ नोव्हेंबर २०२२) रत्नागिरीकर रसिकांचे कान तृप्त करणार आहे. या मैफलीत गायन तर लहान मुले करणार आहेतच; पण संवादिनी, तबला, पखवाज, तालवाद्यं आदींची साथही मुलेच करणार आहेत. एवढेच नव्हे, तर या मैफलीचे निवेदनही मुलेच करणार आहेत. मैफलीचे ध्वनिसंयोजन आणि आयोजनही मुलेच करणार आहेत. ‘सूर निरागस’ असे या मैफलीचे नाव आहे.