रत्नागिरीच्या प्रवेशद्वारी भागोजीशेठ कीर, गाडगेबाबांचे पुतळे उभारण्याची मागणी

रत्नागिरी : रत्नागिरी शहराचे प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप सर्कलमध्ये श्रीमान भागोजी शेठ कीर, संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांचे पूर्णाकृती पुतळे उभारावेत, अशी मागणी श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा या संस्थेतर्फे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

सावरकरांनी सुरू केलेला सहभोजनाचा कार्यक्रम पतितपावन मंदिरात पुन्हा सुरू होणार

रत्नागिरी : दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी २४ फेब्रुवारी १९३१ रोजी पतितपावन मंदिराच्या कलशारोहणाच्या वेळी सुरू केलेला ऐतिहासिक सहभोजनाचा कार्यक्रम यंदापासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.