रत्नागिरीच्या प्रवेशद्वारी भागोजीशेठ कीर, गाडगेबाबांचे पुतळे उभारण्याची मागणी

रत्नागिरी : रत्नागिरी शहराचे प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप सर्कलमध्ये श्रीमान भागोजी शेठ कीर, संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांचे पूर्णाकृती पुतळे उभारावेत, अशी मागणी श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा या संस्थेतर्फे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

पूर्णाकृती पुतळ्यांचा प्रस्ताव चांगल्या प्रकारे मार्गी लावण्याचे आश्वासन पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिले.

साळवी स्टॉप येथील प्रवेशद्वारी नियोजित रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या कामानंतर साकार होणाऱ्या भव्य सर्कलमध्ये दानशूर भक्तभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर आणि त्यांचे गुरू संतश्रेष्ठ श्री गाडगे बाबा यांचे पूर्णाकृती पुतळे बसविण्यात यावेत, अशी निवेदात करण्यात आली आहे. हे निवेदन आज राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना देण्यात आले. श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाच्या पुढाकाराने निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

यावेळी कट्ट्याचे मुख्य संयोजक सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये, सचिव सुरेंद्र घुडे, रत्नागिरी जिल्हा परीट समाजाचे ज्येष्ठ सल्लागार प्रभाकर कासेकर आणि मधुकर कदम, जिल्हा परीट समाजाचे अध्यक्ष राजेंद्र नेरकर, रोहिदास समाज संघटनेचे विजय खेडेकर, परीट समाजाचे कार्यकर्ते प्रीतम पावसकर, केदार कोरगावकर इत्यादी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply