रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या मराठी उद्योजकांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त अशोकजी दुगाडे येत्या शुक्रवारी (दि. २७ ऑक्टोबर) रत्नागिरीत येत आहेत.
केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशासह जगभरातील मराठी उद्योजकांना एकत्र आणण्याच्या ध्येयाने २००० साली सुरू झालेल्या सॅटर्डे क्लबचे कार्य विभाग (रिजन) आणि त्यानंतर चॅप्टर (शाखा) यामधून चालते. उद्योजकांना आपला व्यवसाय वेगवेगळ्या ठिकाणी नेता यावा, यासाठी वेळोवेळी क्लस्टर मीटिंग (संयुक्त बैठक) आयोजित केल्या जातात. याच अनुषंगाने कोकण रिजन आणि पनवेल चॅप्टरची संयुक्त बैठक येत्या शुक्रवारी रत्नागिरी रेल्वेस्थानकाजवळ संगम हॉटेलमध्ये दुपारी दोन वाजल्यापासून होणार आहे. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी अशोकजी दुगाडे उपस्थित राहणार आहेत. श्री. दुगाडे सर इंडियन ओव्हरसिस बँकेचे आणि महाराष्ट्र बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यभार सांभाळला आहे. व्यवसायाचे बॅलन्सशीट या विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. सॅटर्डे क्लबचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल श्रीकृष्ण पाटीलसुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
बैठकीला रत्नागिरी, कुडाळ, चिपळूण, दापोली आणि पनवेल येथून शंभराहून अधिक उद्योजक उपस्थित राहणार आहेत. आपला व्यवसाय वृद्धिंगत करू इच्छिणाऱ्या मराठी उद्योजकांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन सॅटर्डे क्लबचे कोकण रिजन हेड राम कोळवणकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी चॅप्टरचे चेअरपर्सन प्रतीक कळंबटे (9665299329), सेक्रेटरी प्रकाश भुरवणे (82759 19821) किंवा डेप्युटी रिजन हेड तुषार आग्रे (80070 88972) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

