नव्या वर्षाचा पहिला रविवार मराठी भाषेसाठी धावण्याचा; रत्नागिरीत तिसरी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन उत्साहात

देशाच्या १३ राज्यांतील ३०० शहरांतील २२००हून अधिक धावपटू नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी रत्नागिरीत मराठी भाषेसाठी धावले. चढ-उतार, वळणांचे रस्ते असलेले २१ किलोमीटरचे अंतर एक तास १० मिनिटे सात सेकंदांत पूर्ण करून अभिषेक देवकातेने स्वतःचाच विक्रम मोडून स्पर्धा जिंकली.

रत्नागिरीत ४ जानेवारीला तिसरी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या ४ जानेवारी २०२५ रोजी तिसरी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन होणार आहे. सर्व धावपटू मराठी भाषेसाठी धावणार आहेत. ही जगातील कुठल्याही भाषेसाठी समर्पित पहिली अर्धमॅरेथॉन आहे.