मंडणगडमध्ये सरन्यायाधीशांच्या हस्ते न्यायालयाचे उद्घाटन

मंडणगड : मंडणगडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे उद्घाटन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज (१२ ऑक्टोबर) मंडणगडमध्ये केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अखेर न्याय मंडणगडच्या दारी; तालुक्याला ६३ वर्षांनी मिळाले दिवाणी व फौजदारी न्यायालय

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्याची निर्मिती १९६० साली झाली. त्यानंतर ६३ वर्षांनी तालुक्यात दिवाणी आणि फौजदारी न्यायालय सुरू झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आज (८ ऑक्टोबर २०२३) दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाचे उद्घाटन मंडणगडमध्ये झाले.