रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मृतिशिल्पाचे उद्घाटन सात ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झाले. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या टागोरांच्या विचारांचे अनुकरण केल्यास जीवन समृद्ध होईल आणि त्यांच्या भित्तिचित्राचे स्मृतिशिल्प प्रेरक ठरेल, असे ते म्हणाले.