राज्य स्पर्धेतील नाटकांची संख्या वाढणे आवश्यक – समीर इंदुलकर

रत्नागिरी : राज्य नाट्य स्पर्धेतील उत्साह आणि नाटकांची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या सांस्कृतिक चळवळीलाच चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले.