‘कोकणात भरपूर पाऊस पडूनही उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. निसर्गाने
आपल्याला पाणी भरभरून दिले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी योग्य पद्धतीने साठवणे
आणि त्याचा पुनर्वापर करणे हीच काळाची गरज आहे. त्यासाठी फेरोसिमेंट
तंत्रज्ञानाचा वापर करणे किफायतशीर ठरते. पावसाचे पाणी साठवण्याबद्दल जागरूकता
झाल्यास कोकण आपली समृद्धी आजच्या काळातही टिकवू शकेल,’ असे प्रतिपादन
मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक व जलतज्ज्ञ उल्हास परांजपे यांनी
केले.