पुण्यातील वेदमूर्ती प्रकाश दंडगे यांचा रत्नागिरीत सन्मान; आठल्ये गुरुजी, फडकेशास्त्रींचे आशीर्वाद म्हणून पुरस्कार स्वीकारत असल्याची भावना

वे. मू. (कै.) आठल्ये गुरुजी आणि (कै.) फडकेशास्त्री या वेद आणि शास्त्रातील दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झाडगाव येथील संस्कृत पाठशाळेत विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात वे. मू. दत्तात्रेय मुरवणे गुरुजी, अनंतशास्त्री मुळे, जयराम आठल्ये यांच्या हस्ते दंडगे गुरुजींचा सन्मान करण्यात आला.

वेदमूर्ती आठल्ये गुरुजी आणि फडकेशास्त्रींच्या स्मृतिप्रीत्यर्थ रत्नागिरीत तीन मार्चपासून विशेष कार्यक्रम

रत्नागिरी : वेद आणि शास्त्र या विषयातील रत्नागिरी जिल्ह्यातील दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरीच्या संस्कृत पाठशाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. वैदिक मार्तंड व वैदिक शिरोमणी वे. मू. कै. विनायक सीताराम आठल्ये गुरुजी आणि व्याकरणाचार्य कै. पु. ना. फडकेशास्त्री यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फाल्गुन शुद्ध चतुर्थी ते फाल्गुन शुद्ध अष्टमी शके १९४६ (३ मार्च ते ७ मार्च २०२५) या कालावधीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे यंदा चौथे वर्ष आहे.

वेदमूर्ती आठल्ये गुरुजी आणि फडकेशास्त्रींच्या स्मृतिप्रीत्यर्थ रत्नागिरीत ११ मार्चपासून विशेष कार्यक्रम

वेद आणि शास्त्र या विषयातील रत्नागिरी जिल्ह्यातील दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरीच्या संस्कृत पाठशाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.