रत्नागिरी : ‘सर्वोदय छात्रालय अमृत महोत्सव साजरा करत आहे. छात्रालयाला शासकीय अनुदान नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भोजनाचा खर्च, दत्तक-पालक योजना, गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी विद्यासंकुल विकसित करण्याचा संकल्प केला आहे. याकरिता माजी विद्यार्थी आणि समाजातील जास्तीत जास्त दानशूरांनी मदत करावी,’ असे आवाहन यमुनाबाई खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष व विद्यमान व्यवस्था समितीचे सदस्य हरिश्चंद्र गीते यांनी रविवारी (१० डिसेंबर) रत्नागिरीत केले.