शुद्ध तेलाच्या उद्योगाने साकारले स्वप्न

कशेळीच्या साक्षी नाटेकर यांनी लहानपणापासून जपलेल्या स्वप्नाला सत्यात उतरवले. नुसतेच गृहिणी म्हणून न राहता काहीतरी उपजीविकेचे साधन असावे, म्हणून त्यांनी शुद्ध खोबरेल तेलाच्या उद्योगात उडी घेतली आणि आता तो उद्योग त्या समर्थपणे पेलत आहेत.