श्रद्धा कळंबटे यांना स्वरूपयोगिनी पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचा स्वरूप योगिनी पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रद्धा कळंबटे यांना प्रदान करण्यात आला.

श्रद्धा कळंबटे, अमृता करंदीकर, मीनल ओक यांना स्वरूपयोगिनी पुरस्कार

पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे रत्नागिरीतील वरचीआळी येथील अध्यात्म मंदिरात स्वरूपानंद व्याख्यानमाला सोमवार, दि. २२ सप्टेंबरपासून २४ सप्टेंबरपर्यंत दिवस चालणार आहे. यामध्ये तीन व्याख्याने होणार असून या प्रसंगी स्वरूपयोगिनी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यंदा हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रद्धा कळबंटे, पर्यटन व्यावसायिक सौ. अमृता करंदीकर आणि चिपळूणच्या सौ. मीनल ओक यांना जाहीर झाला आहे.

कोकणातील बंद घरांच्या चाव्या स्त्रियांच्याच हाती : श्रद्धा कळंबटे

तळवडे (ता. राजापूर) : महिलांनी स्वतः पुढाकार घेतल्याशिवाय समाज बदलणार नाही. पुराणातल्या सावित्रीने पतीचे प्राण परत आणले, आधुनिक सावित्रीने शिक्षणाची दारे खुली केली. कोकणातील बंद दारांची समस्या सोडवण्याची शक्ती स्त्रियांच्या हाती आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे यांनी व्यक्त केले.