सर्वोदय छात्रालयातील संस्कार शिदोरीमुळेच पुरस्कार – रघुवीर शेलार

रत्नागिरी : सर्वोदय छात्रालयातील शिस्तबद्ध नियमित दिनक्रम, शरीरश्रम, स्वावलंबन, सहकार्यशील सहजीवन, मानवतादी दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी ही छात्रालयातील संस्कार शिदोरी घेऊन मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे ट्रस्ट व सामाजिक कार्य चालू ठेवू शकलो, असे प्रतिपादन रघुवीर शेलार यांनी केले.

चारित्र्यसंपन्न ज्ञान आवश्यक – डॉ. सदानंद आग्रे

रत्नागिरी : शिक्षण हे खऱ्या अर्थाने सामाजिक समता निर्माण करणारे असावे. माणसाला माणूस म्हणून जगवणारे असावे. ज्ञानाच्या क्षेत्रात आढळणारा चारित्र्याचा अभाव व राजकीय क्षेत्रात आढळणारा तत्त्वांचा विसर लक्षात घेता चारित्र्यसंपन्न ज्ञान आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. सदानंद आग्रे यांनी केले.

सर्वोदय छात्रालयातून बाहेर पडलेल्यांची नाळ सामाजिक कार्यात जोडलेली- डॉ. कोदारे

रत्नागिरी : सर्वोदय छात्रालयातून बाहेर पडलेल्या अनेकांची नाळ सामाजिक कार्यात जोडलेली आहे, याचे श्रेय माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते यांनाच जाते, असे प्रतिपादन डॉ. श्रीपाद कोदारे यांनी केले.

डॉ. श्रीपाद कोदारे यांना सर्वोदय पुरस्कार

रत्नागिरी : श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टच्या सर्वोदय छात्रालयाचा सर्वोदय पुरस्कार डॉ. श्रीपाद कोदारे यांना येत्या रविवारी, दि. ११ मे रोजी प्रदान करण्यात येणार आहे.