तेच ते आणि तेच ते

पंचवीस वर्षांनंतरच्या रत्नागिरी जिल्ह्याचे चित्र कसे असेल आणि कसे असावे, याचा ऊहापोह करणारा एक कार्यक्रम रत्नागिरीत पार पडला. कोकणाविषयीचे जे मुद्दे मांडले गेले, त्याला चर्चासत्र म्हटले असले, तरी त्याचे स्वरूप तसे नव्हते. कारण चर्चासत्रातून एखादे सार काढले जाते. तसे याबाबतीत झाले नाही. सर्व भाषणे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ऐकली. पण त्यांनी त्या मुद्द्यांसंदर्भात काहीही ठोस सांगितले नाही. उद्योग विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा त्यांनी घेतला. पण राज्याच्या इतर भागांपेक्षा कोकणात उद्योगांना विरोध होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

आता ग्रामस्थांनीच शोध घ्यावा

महिलांच्या सॅनिटरी पॅडची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल मशीन म्हणजेच इन्सिनरेटर खरेदी करण्यासाठी प्रत्येक गावाला जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिला होता, पण मोजक्या ग्रामपंचायती वगळता अन्य बहुसंख्य ग्रामपंचायतींनी इन्सिनरेटर बसविलेले नाहीत. नेहमीच्या कचऱ्यापेक्षा सॅनिटरी पॅडसारखा वैद्यकीय कचरा नागरी आरोग्यासाठी अत्यंत घातक असतो. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीला निधी देण्यात आला होता. या निधीचे काय झाले, याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही नाही.