स्वगृही संस्थेतर्फे केळ्ये येथे लवकरच सुसज्ज वृद्धाश्रम

रत्नागिरी : खरे तर भारतीय संस्कृती ही नात्यांची वीण घट्ट करणारी आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेली वृद्धाश्रमांची संख्या बघता आपल्या या संस्कृतीला कुठेतरी खिंडार पडले आहे का, अशी शंका येत असल्याची भीती लेखिका सौ. सुनेत्रा जोशी यांनी व्यक्त केली.

वेगवान जीवनपद्धतीमुळे वृद्धाश्रमांची गरज

वृद्धाश्रमांची गरज प्रामुख्याने वेगवान जीवनपद्धतीसाठी अनेक कारणांसाठी आहे. विभक्त कुटुंबपद्धती, पती-पत्नी दोघे नोकरीमध्ये, लग्न न झाल्यामुळे, मुले परदेशात अशा अनेक कारणांचा त्यात समावेश आहे. सांगत आहेत, शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील स्वगृही सेवा संस्था वृद्धाश्रमाच्या श्रीमती वीणा लेले.