महिला आरक्षणाचा श्रीगणेशा होऊन बराच काळ लोटला. आता त्याला नवे बळ मिळाले आहे. या संधीचा स्वीकार आणि अंमलबजावणी महिलांनी मात्र कसोशीने करायला हवी. त्यासाठी आग्रही राहायला हवे. कायदा झाल्यानंतर महिला उमेदवार निवडणे आणि त्यांचे प्रशिक्षण यासाठीही प्रयत्न करायला हवेत. तरच नव्या कायद्याला अर्थ प्राप्त होणार आहे.