विठ्ठला महाकाळ यांचे आकस्मिक निधन; कला, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड

रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ गावचे सुपुत्र विठ्ठला महाकाळ यांचे शनिवारी (४ मार्च २०२३) रत्नागिरीतील राहत्या घरी आकस्मिक निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. शासनाच्या कृषी विभागात असताना त्यांनी इतरही विविध क्षेत्रांत कार्य केले.

आगरनरळच्या शिमगोत्सवाचा व्हिडिओ

रत्नागिरी : कोकणातील पारंपरिक ‘शिमगोत्सव’ आजही गावागावांतून जपला जात आहे. आगरनरळ (ता. जि. रत्नागिरी) या गावातील शिमगोत्सवाबद्दलचा व्हिडिओ प्रहर विठ्ठला महाकाळ या तरुणाने चित्रित केला आहे. शिमगोत्सवातील पालखीनृत्य, खेळे नाचवणे आदी सर्व प्रकार या व्हिडिओत पाहायला मिळतात. त्याचा हा व्हिडिओ सोबत देत आहोत.