दुर्मीळ, ऐतिहासिक दंडक्रम पारायणाबद्दल महाराष्ट्राच्या १९ वर्षीय वेदमूर्तींचे पंतप्रधान मोदींसह योगी आदित्यनाथांकडून कौतुक

महाराष्ट्रातील वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी मोठा पराक्रम केला आहे. अहिल्यानगरच्या श्रुतिस्मृति ज्ञानमंदिर वेदपाठशाळेचे वेदमूर्ती देवव्रत यांनी शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन शाखेचे ‘दंडक्रम पारायण’ पूर्ण केले.