सुरुवात करा, सातत्य राखा आणि सफल व्हा : आशीष कासोदेकर

रत्नागिरी : फेसबुक, इन्स्टाग्राम, रील्स आणि शॉर्ट्सच्या जमान्यात प्रेरणादायी गोष्टींची कमतरता नाही. कमतरता आहे ती सुरुवात करण्याची आणि सुरुवात झाल्यावर सातत्य राखण्याची. ते राखावे आणि यशस्वी व्हावे, असा कानमंत्र विश्वविक्रमी मॅरेथॉन रनर आशीष कासोदेकर यांनी रत्नागिरीकरांना दिला.

कोस्टल मॅरेथॉनच्या प्रसारासाठी विश्वविक्रमी आशीष कासोदेकर रत्नागिरीत

रत्नागिरी : रत्नागिरीकरांनी संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली मॅरेथॉन असा जिचा उल्लेख केला जात आहे, त्या कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या प्रचारासाठी विश्वविक्रमी रनर आशीष कासोदेकर येत्या शनिवारी (दि. २१ ऑक्टोबर) रत्नागिरीत येत आहेत.