कुडाळ : ‘करोना’च्या संकटामुळे सर्वांनाच सध्या घरात थांबणे बंधनकारक झाले आहे. तरीही ‘हाडाचा कलाकार’ स्वस्थ बसू शकत नाही. त्यांच्या कलेच्या आविष्काराला व्यासपीठ मिळावे आणि ‘करोना’मुळे सतत घरी राहणे सुसह्य, सुखकारक व्हावे, यासाठी कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्स या संस्थेने ‘घरबसल्या जोपासू… वारसा कलेचा… ही एक आगळीवेगळी संकल्पना राबविली. त्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेला महाराष्ट्र आणि गोव्यातून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यातील सहा जणांनी रोख पारितोषिकेही पटकावली आहेत.