हाडाच्या कलाकारांनी लॉकडाऊनवर मात करतानाच मिळविली पारितोषिके

कुडाळ : ‘करोना’च्या संकटामुळे सर्वांनाच सध्या घरात थांबणे बंधनकारक झाले आहे. तरीही ‘हाडाचा कलाकार’ स्वस्थ बसू शकत नाही. त्यांच्या कलेच्या आविष्काराला व्यासपीठ मिळावे आणि ‘करोना’मुळे सतत घरी राहणे सुसह्य, सुखकारक व्हावे, यासाठी कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्स (जि. सिंधुदुर्ग) या संस्थेने घरबसल्या जोपासू… वारसा कलेचा… ही एक आगळीवेगळी संकल्पना राबविली. त्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेला महाराष्ट्र आणि गोव्यातून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यातील सहा जणांनी रोख पारितोषिकेही पटकावली आहेत.

स्पर्धकाने गायन, वादन, नृत्य, अभिनय, चित्रकला इत्यादीपैकी त्याला अवगत असलेली कोणतीही एक कला सादर करून त्याचा व्हिडीओ तयार करून आयोजकांना पाठवायचा होता. ही स्पर्धा महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी खुली होती. स्पर्धेत २६७ स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले. स्पर्धकांनी सादर केलेल्या कलाविष्काराचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांनी केले आणि निकाल जाहीर केला. पहिल्या सहा विजेत्यांना बाबा वर्दम थिएटर्सतर्फे प्रमाणपत्र, रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

स्पर्धेतील गुणानुक्रमे पहिले सहा विजेते असे (कंसात पारितोषिकाची रक्कम) – रामेश्वर सावंत, कणकवली
(रोख रु. १५००/-), खुशी ठाकूर, फोंडा-गोवा (रोख रु. १२५०/-), तृप्ती जाधव, मुंबई ((रोख रु. १०००/-), स्वराली साळसकर, वालावल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग (रोख रु. ७५०/-), सावली ठाकूर, फोंडा-गोवा (रोख रु. ५००/-), प्रियांका भावे, पुणे, (रोख रु. ३००/-)

याशिवाय ३२ स्पर्धकांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. हे स्पर्धक असे – १) अजिंक्य टेकाळे, अंबाजोगाई-बीड, २) मंदार पाटकर, पाट-कुडाळ, ३) प्रतीक्षा खातू, महाड- रायगड, ४) रामेश्वरी जामदार, कल्याण, ५) वेदिका नवार, वालावल, ६) मूर्तिशाळा, कुडाळ, ७) स्मिता नाबर, कुडाळ, ८) संकेत म्हापणकर, माजगाव-सावंतवाडी, ९) विठ्ठल सावंत, असनिये-सावंतवाडी, १०) शीतल इनामदार, पुणे, ११) सुहानी साळसकर, वालावल, १२) शुभांगी मदने, कोरेगाव- सातारा, १३) नीता श्रॉफ, पालघर, १४) श्रद्धा ठक्कर, पालघर, १५) स्मिता शहा, पालघर, १६) नामदेव मोहिते, पालघर, १७) सुरेखा राजे, पालघर, १८) संदेश सामंत, कोल्हापूर, १९) सायली केळुसकर, रत्नागिरी, २०) सुलोचना प्रभू, तेंडोली-कुडाळ, २१) मंजूषा बहालकर, मुंबई, २२) सुगंधा मालुसरे, २३) आर्या हिरे, नाशिक, २४) अक्षय सरवणकर, होडावडा, ता. वेंगुर्ले, २५) स्नेहल करंबेळकर, कणकवली, २६) वैष्णवी हजारी, कल्याण, २७) दिपक कुरळपकर, कोल्हापूर, २८) सई मोने पाटील, नाशिक, २९) ईशा गोडकर, शिरोडा, ता. वेंगुर्ले, ३०) एकनाथ गंगावणे, पिंगुळी-कुडाळ, ३१) प्रथमेश कदम, ओरोस, ३२) रवीना गोगावले, सातारा.

सर्व विजेत्यांना त्यांची पारितोषिके आणि प्रमाणपत्रे संचारबंदी संपल्यानंतर घरपोच पाठविली जाणार आहेत, असे बाबा वर्दम थिएटर्सचे कार्यवाह केदार सामंत यांनी कळविले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply