सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे १७ एप्रिल २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.
हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/1fgfuad येथे क्लिक करा.
या अंकात काय वाचाल?
संपादकीय : आढावा बैठका आणि दौरे आधी थांबवा…. (वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
मुखपृष्ठकथा : हेल्पिंग हँड्स : करोनालढ्यातील मानवी साखळी
सहकार रुजत नाही असे म्हटले जाणाऱ्या कोकणात तब्बल २९ संस्था एकत्र येऊन ‘हेल्पिंग हँड्स’ नामक अदृश्य साखळीद्वारे जीवनावश्यक वस्तूंचा मागणीप्रमाणे घरपोच पुरवठा करण्याचे सेवाभावी कार्य विनामोबदला करत आहेत. प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणाऱ्या संघटनेच्या कार्याविषयी राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला लेख…
लॉकडाउनमध्ये दिव्यांगांचे जगणे करू सोपे : दिव्यांगांच्या विकासासाठी रत्नागिरीत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षिका सौ. प्रिया अमृत गांधी यांचा लेख… (व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
हा डाव साधलेला : बुलबुलने घातलेली अंडी आणि मांजराने साधलेला डाव… धीरज वाटेकर यांचा ललित लेख..
बोली : देव तारी त्याला कोण मारी – डॉ. प्रणव अशोक प्रभू यांनी लिहिलेला संगमेश्वरी बोलीतील लेख
करोना संकट टळल्यावर पुन्हा जाऊ निसर्गाकडे : अॅड. गिरीश राऊत यांचा लेख
… म्हणून घातला करोनाने आपल्याला विळखा : बाबू घाडीगावकर यांचा लेख…
या व्यतिरिक्त वाचक पत्रे, देविदास देशपांडे यांची व्यंगचित्रे, आदी..
संपादक : प्रमोद कोनकर
Very nice for kokan area viewers