मुंबई : राज्यातील ७० ते ७५ टक्के लोक बाहेर फिरताना मास्क वापरताना दिसतात. उरलेले २५ टक्के लोक विनामास्क फिरत आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आणि समाजाला धोका होऊ शकतो, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.