विद्याभारतीकडून माणूस घडविण्यासाठी प्रयत्न : श्रीरामजी आरावकर

ठाणे : माणूस घडविण्यासाठी माणूस जोडणे आवश्यक आहे, हा विचार पुढे नेणे असून विद्याभारतीच्या शैक्षणिक चळवळीतून ते नक्कीच साध्य होईल, असा विश्वास विद्याभारतीचे अखिल भारतीय महामंत्री श्रीरामजी आरावकर यांनी कनेक्ट विथ विद्याभारती उपक्रमाच्या प्रारंभाच्या वेळी व्यक्त केला.

कनेक्ट विथ विद्याभारती अभियानाला शुक्रवारी प्रारंभ

अंबरनाथ : विद्याभारती या शैक्षणिक संस्थेच्या कनेक्ट विथ विद्याभारती या उपक्रमाला शुक्रवारी (दि. २७ नोव्हेंबर) प्रारंभ होत आहे. भारतीय पद्धतीच्या शिक्षणाविषयी आस्था असलेल्या शिक्षणप्रेमींनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.