पाणीपातळी, वाहतुकीपासून इमर्जन्सी नंबर्सपर्यंत… सारी माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर; राज्यात सर्वप्रथम रत्नागिरीत उपक्रम सुरू

कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रत्येक नागरिकाला जिल्ह्यातील पर्जन्यमान, नद्यांची पाणीपातळी, रस्ते वाहतूक आदी सारी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट प्रणाली सुरू केली आहे. त्यामुळे अशा प्रकारची ताजी माहिती नागरिकांना अगदी सहज म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून क्षणात प्राप्त करता येणार आहे.