डुगवे येथील लोटेश्वर मंदिराच्या नयनरम्य परिसरात बासरीवादन – प्रहर महाकाळ (व्हिडिओ)

सहा सप्टेंबर रोजी यंदाचा शेवटचा श्रावणी सोमवार आहे. त्या निमित्ताने, रत्नागिरीतला युवा कलाकार प्रहर महाकाळ याने बासरीवादनाचा विशेष व्हिडिओ तयार केला आहे. रत्नागिरी तालुक्यातल्या कुरतडे गावाजवळच्या डुगवे नावाच्या गावात एका पाषाणावर असलेल्या श्री लोटेश्वर मंदिराच्या नयनरम्य परिसरात प्रहरने हे बासरीवादन केले आहे. हा व्हिडिओ सोबत देत आहोत.

ऐ मेरे वतन के लोगों – बासरीवादन – प्रहर महाकाळ

आज देशाचा ७५वा स्वातंत्र्यदिन आहे. त्या निमित्ताने, मूळचा रत्नागिरीकर असलेल्या प्रहर विठ्ठला महाकाळ या युवा कलाकाराने बासरीवर ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणं वाजवलं आहे. व्हिडिओ सोबत देत आहोत.