संकीर्तनातून रसिकांनी घेतला सांगीतिक समाधीचा अनुभव

रागदारीवर आधारित गीतांच्या नृत्यांमधून साकारलेली कला अनुभवताना संकीर्तन या कार्यक्रमात रसिकांनी सांगीतिक समाधीचा अनुभव घेतला. मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात १०७वा चैत्रोत्सव सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने मंगळवारी (चार एप्रिल) मिरज येथील रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या नृत्यश्री संस्थेने संकीर्तन हा कार्यक्रम सादर केला.

श्री लक्ष्मीपल्लीनाथाची गाथा ई-बुक स्वरूपात मराठी आणि इंग्रजीत प्रकाशित

श्री लक्ष्मीपल्लीनाथ या देवतेचा इतिहास आणि अन्य महत्त्वपूर्ण संदर्भांची माहिती देणारी ‘गाथा श्री लक्ष्मीपल्लीनाथाची’ ही पुस्तिका ई-बुक स्वरूपात प्रकाशित करण्यात आली आहे. संदीप नाटेकर यांनी केलेल्या त्या पुस्तिकेच्या इंग्रजी अनुवादाचेही ई-बुक प्रकाशित करण्यात आले आहे.