राज्यातील नुकसानग्रस्त मच्छिमारांसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद

राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज (७ ऑक्टोबर २०२५) रोजी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी व मच्छिमारांच्या बोटींच्या नुकसानभरपाईसाठी १०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

जयगड बंदर महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करणार; वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गासाठीही पाठपुरावा सुरू : नीतेश राणे

कोकणाच्या विकासाला चालना देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातलं जयगड बंदर हे एक महत्त्वाचं केंद्र (हब) म्हणून विकसित केलं जाणार आहे. त्याला कोकणाला राज्याच्या अन्य भागाशी जोणाऱ्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचीही जोड दिली जाईल. यामुळे कोकणवासीयांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होईल, असं प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकासमंत्री नीतेश राणे यांनी आज (११ सप्टेंबर) जयगडमध्ये केलं.