‘कबीर अॅकॅडमी’चे एम. जी. कबीर यांचे निधन

रत्नागिरी : लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देणारी ‘कबीर अॅकॅडमी’ आणि ‘सारस्वत मित्र’ मासिक यांचे व्यवस्थापक मोहन गणेश तथा एम. जी. कबीर (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले.