‘महामार्ग, पिण्याचं पाणी, रत्नागिरी विमानतळ आणि उद्योगधंदे या प्राधान्यक्रमाने मी काम करणार आहे. खासदार म्हणून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. लोकांना अपेक्षित असलेलं काम मी करू शकेन, असा मला विश्वास वाटतो. लोकांनी विश्वास ठेवला, तो मी सार्थकी लावीन. जवळपास ३९ वर्षांनी इथे भाजपचा खासदार निवडून आला आहे, याचा आनंद आहे. आता आम्ही त्यात सातत्य ठेवू,’ असं प्रतिपादन विद्यमान केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलं.