प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धा : रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे देशातल्या पहिल्या पाच अधिकाऱ्यांमध्ये

प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धा : रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे देशातल्या पहिल्या पाच अधिकाऱ्यांमध्ये

प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धेत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक
नितीन बगाटे यांची देशातल्या पहिल्या पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाली
आहे. त्यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या रेड्स या कृत्रिम बुद्धिमत्ता
तंत्रज्ञानावर आधारित ॲपचं सादरीकरण हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल
राष्ट्रीय पोलीस अकादमीत करण्यात आलं.