प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धा : रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे देशातल्या पहिल्या पाच अधिकाऱ्यांमध्ये

प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धा : रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे देशातल्या पहिल्या पाच अधिकाऱ्यांमध्ये

रत्नागिरी : प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धेत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची देशातल्या पहिल्या पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाली आहे. त्यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या रेड्स या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित ॲपचं सादरीकरण हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत करण्यात आलं.

अज्ञात आणि बेवारस मृतदेहांची ओळख पटवणं हे गुन्ह्याची उकल होण्यासाठी अत्यंत आवश्यक, मात्र खूपच आव्हानात्मक काम असतं. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संकल्पना रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मांडली. त्यातून रेड्स अर्थात रत्नागिरी ॲडव्हान्स डेटा इंटिग्रेटेड सिस्टीम हे ॲप्लिकेशन तयार करण्यात आलं. बेवारस मृतदेहांची माहिती त्यात एकत्रित संकलित केली जाते. संबंधित मृतदेहांची उपलब्ध छायाचित्रं आणि इतर माहितीच्या आधारे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार केली जाते. चेहरा ओळखणं कठीण असलेल्या प्रकरणांमध्येही उपलब्ध माहितीच्या आधारे संभाव्य चेहरा तयार केला जातो. बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी चेहऱ्याची १०८ विविध रूपं तयार करून तांत्रिक पद्धतीने शोध घेतला जातो. या ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत २१ मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलं असून, ११ बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणंही शक्य झालं आहे. या उपक्रमाची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply