दापोली : अधिक मासानिमित्ताने तीस तीन म्हणजेच तेहतीस घरी जाऊन झाडाचे एक रोप देऊन तेथे वृक्ष वाढदिवस साजरा करा, असे आवाहन पर्यावरणप्रेमी आणि ज्येष्ठ पत्रकार प्रशांत परांजपे यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
दापोली : अधिक मासानिमित्ताने तीस तीन म्हणजेच तेहतीस घरी जाऊन झाडाचे एक रोप देऊन तेथे वृक्ष वाढदिवस साजरा करा, असे आवाहन पर्यावरणप्रेमी आणि ज्येष्ठ पत्रकार प्रशांत परांजपे यांनी केले.
रत्नागिरीसह सर्वत्र सर्वसामान्यांच्या नजरेला दिसणारा प्लास्टिकचा कचरा त्याच रस्त्यावरून भरधाव वेगाने धावणारे मंत्री, आमदार, त्यांच्या पाठीमागून फिरणारे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामपंचायतीपर्यंतच्या कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिसत नाही. त्याचे काही करावे, असे त्यांना वाटत नाही. प्रसारमाध्यमे आणि जाहीर कार्यक्रमात प्लास्टिकविरोधातील घोषणा दिल्या, की त्यांचे काम संपले!