रत्नागिरी तालुका पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी शलाका सावंतदेसाई

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या रत्नागिरी तालुकाध्यक्ष ग्रामीण विभाग अध्यक्षपदी खेडशी गावच्या पोलीस पाटील श्रीमती शलाका सावंतदेसाई यांची निवड झाली आहे. तालुकाध्यक्षपदी निवड होणाऱ्या श्रीमती सावंतदेसाई या पहिल्या महिला आहेत.