कीर्तनसंचित, राघवयादवीयम् पुस्तिकांचे कीर्तनसंध्या महोत्सवात प्रकाशन

रत्नागिरी : रामराज्य ते महाभारत कीर्तनसंचित आणि राघवयादवीयम् या दोन पुस्तकांचे प्रकाशन येथे सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात झाले.

पाच दिवसांच्या कीर्तन महोत्सवाला रत्नागिरीत प्रारंभ

रत्नागिरी : कीर्तनसंध्या परिवारातर्फे रत्नागिरीत आयोजित केलेल्या पाच दिवसांच्या चौदाव्या कीर्तन महोत्सवाला आज थाटात प्रारंभ झाला.

रत्नागिरीत उद्यापासून १४वा कीर्तनसंध्या महोत्सव; महाभारतकथा ऐकण्याची पर्वणी

रत्नागिरी : कीर्तनातून समाजप्रबोधनाचे व्रत अंगीकारून रत्नागिरीत सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाचे १४वे पर्व उद्यापासून (आठ जानेवारी २०२५) रत्नागिरीत सुरू होत आहे. कीर्तनसंध्या महोत्सवात यंदा सर्वांत मनोवेधक, अनोख्या, अनुकरणीय अशा महाभारत या विषयावरील निरूपण राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे करणार आहेत. १२ जानेवारीपर्यंत हा उत्सव रत्नागिरीतील स्व. प्रमोद महाजन क्रीडासंकुलात होणार आहे. पितांबरी हे या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक आहेत.

कीर्तनसंध्या महोत्सवाच्या सन्मानिका विविध ठिकाणी उपलब्ध

रत्नागिरी : येत्या ८ ते १२ जानेवारी २०२५ या काळात रत्नागिरीत होणार असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या सन्मानिका शहरात विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कीर्तनसंध्या महोत्सवात जानेवारीमध्ये आफळेबुवा उलगडणार महाभारत

रत्नागिरी : येथील कीर्तनसंध्या महोत्सवात येत्या जानेवारीमध्ये सर्वांत मनोवेधक, अनोख्या, अनुकरणीय महाभारत या विषयावरील निरूपण राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे करणार आहेत.

रावणवध म्हणजे रामाने विश्वावर मिळविलेला विजय : आफळेबुवा

रत्नागिरी : रावणवध म्हणजे रामाने विश्वावर मिळविलेला विजय होता, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.