पाच दिवसांच्या कीर्तन महोत्सवाला रत्नागिरीत प्रारंभ

रत्नागिरी : कीर्तनसंध्या परिवारातर्फे रत्नागिरीत आयोजित केलेल्या पाच दिवसांच्या चौदाव्या कीर्तन महोत्सवाला आज (८ जानेवारी) थाटात प्रारंभ झाला.

राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्त गोविंदस्वामी आफळे, रत्नागिरीच्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, मुख्य प्रायोजक असलेल्या पितांबरी उद्योगसमूहाचे राहुल प्रभुदेसाई, देसाई उद्योगसमूहाचे जयंतराव देसाई, फिनोलेक्स उद्योग समूहाचे वरिष्ठ अधिकारी सागर चिवटे, वल्लभ कॅटरर्सचे रूपेश देवस्थळी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन झाले. कीर्तनसंध्या परिवाराचे अवधूत जोशी यांनी बुवांचे स्वागत केले.

या वर्षी महाभारत या विषयावर विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे निरूपण करणार आहेत. बुवांना तबलासाथ केदार लिंगायत, ऑर्गनसाथ चैतन्य पटवर्धन, व्हायोलिनसाथ उदय गोखले, पखवाजसाथ प्रथमेश तारळकर, ॲबल्टन साथ अमेय किल्लेकर, साइड र्‍हिदम साथ शार्दूल मोरे करणार आहेत.

व्हिडिओ लिंक https://fb.watch/w_f5ecCWal

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply