कोकण रेल्वेच्या दहा गाड्या तीन दिवस रद्द, काही गाड्यांमध्ये बदल

नवी मुंबई : मध्य रेल्वेवर ठाणे आणि दिवा स्थानकांच्या दरम्यान करावयाच्या तांत्रिक कामांमुळे कोकण रेल्वेच्या दहा गाड्या ५ ते ७ फेब्रुवारी या काळात रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या सुटण्याचे आणि पोहोचण्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे.