नवी दिल्ली : भारताने देशातल्या १०० कोटी नागरिकांचे कोविडप्रतिबंधक लसीकरण करण्याचा ऐतिहासिक टप्पा आज, २१ ऑक्टोबर २०२१ रोजी गाठला आहे. या वर्षी १६ जानेवारी रोजी भारताचा लसीकरण कार्यक्रम सुरू झाला होता. म्हणजेच अवघ्या १० महिन्यांत भारताने ही कामगिरी केली आहे.
