नवी दिल्ली : भारताने देशातल्या १०० कोटी नागरिकांचे कोविडप्रतिबंधक लसीकरण करण्याचा ऐतिहासिक टप्पा आज, २१ ऑक्टोबर २०२१ रोजी गाठला आहे. या वर्षी १६ जानेवारी रोजी भारताचा लसीकरण कार्यक्रम सुरू झाला होता. म्हणजेच अवघ्या १० महिन्यांत भारताने ही कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे अभिनंदन केले असून, देशातील वैज्ञानिक समुदाय आणि डॉक्टर्स, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनीही हे यश संपादन केल्याबद्दल देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताचा लसीकरणाचा वेग बराच जास्त असून, अनेक खंडांच्या तुलनेत एकट्या भारतात झालेल्या लसीकरणाचा आकडा मोठा आहे.
लसीकरणाच्या आकडेवारीचे विश्लेषण (माहिती संदर्भ – कोविन पोर्टल – २१ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजताची स्थिती)
भारताची अन्य खंडांत झालेल्या लसीकरणाशी तुलना :
भारत : १०० कोटी डोसेस
युरोप : ८३ कोटी
उत्तर अमेरिका : ६६ कोटी
दक्षिण अमेरिका : ४८.१ कोटी
आफ्रिका : १७.६ कोटी
ओशिअॅनिया : ४.१ कोटी
प्रति दिवशी दिले जाणारे डोसेस
भारत : ३५ लाख
अमेरिका : १३ लाख
ब्रिटन : ३ लाख
भारतात झालेलं एकूण लसीकरण : १०० कोटी ३२ लाख ४ हजार २८९
पहिला डोस : ७० कोटी ९५ लाख ५२ हजार ३३
दोन्ही डोस : २९ कोटी ३६ लाख ५२ हजार २५६
देशातल्या लसीकरण केंद्रांची संख्या
१६ जानेवारी २०२१ : ३००६
२१ ऑक्टोबर २०२१ : ८७,७२५
सरकारी : ८५, २१५
खासगी : २५१०
सर्वाधिक लसीकरण झालेली पाच राज्यं :
उत्तर प्रदेश : १२ कोटी २६ लाख ७६ हजार ४२०
महाराष्ट्र : ९ कोटी ३७ लाख ५० हजार १२५
पश्चिम बंगाल : ६ कोटी ८९ लाख ३० हजार ३१७
गुजरात : ६ कोटी ७८ लाख ६७ हजार ५७९
मध्य प्रदेश : ६ कोटी ७५ लाख ९० हजार ९१३
वयोगटानुसार लसीकरण :
१८ ते ४४ वर्षे : ५५ कोटी ७६ लाख १६ हजार ३४५
४५ ते ६० वर्षे : २७ कोटी ५ लाख १२ हजार ५४०
६० वर्षांवरील : १७ कोटी ८ लाख ९६ हजार २७६
लसीकरण झालेल्यांची लिंगनिहाय संख्या
पुरुष : ५१ कोटी ७८ लाख ७५ हजार ४५९
स्त्रिया : ४८ कोटी ९ लाख २५ हजार ८२६
उर्वरित : अन्य
लशीनुसार लसीकरण :
कोविशिल्ड : ८८ कोटी ३५ लाख ६४ हजार ८०९
कोव्हॅक्सिन : ११ कोटी ४४ लाख १० हजार २००
उर्वरित : स्पुटनिक व्ही
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातल्या लसीकरणाचं प्रमाण जास्त आहे.
आतापर्यंत लसीकरण झालेल्यापैकी एकूण ०.००५ टक्के जणांना लसीकरणानंतर अनपेक्षित त्रास झाल्याची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील लसीकरण
पहिला डोस : ९ लाख ३ हजार २३९
दुसरा डोस : ३ लाख ७७ हजार ८११
एकूण : १२ लाख ८१ हजार ५०
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लसीकरण
पहिला डोस : ५ लाख १८ हजार ६३२
दुसरा डोस : २ लाख ७१ हजार ९४८
एकूण : ७ लाख ९० हजार ५८०
भारतातील कोविड स्थिती
गेल्या २४ तासांमध्ये १७,५६१ रुग्ण कोविडमुक्त झाल्याने, आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३,३४,९५,८०८ इतकी झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर सध्या ९८.१५% आहे. हा दर मार्च २०२० नंतरच्या उच्चांकी स्तरावर आहे. गेले सलग ११६ दिवस देशात आढळणाऱ्या दैनंदिन रुग्णांची संख्या ५०,००० पेक्षा कमी आहे. गेल्या २४ तासांत देशभरात १८,४५४ नवीन रुग्णांची नोंद झाली. सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १,७८,८३१ आहे. सक्रिय रुग्ण दर एकूण रुग्णांच्या ०.५२ टक्के आहे. तो मार्च २०२० नंतर सर्वांत कमी आहे.
गेल्या २४ तासांत एकूण १२,४७,५०६ चाचण्या केल्या गेल्या. भारताने आतापर्यंत एकूण ५९.५७ कोटी चाचण्या केल्या आहेत. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर १.३४ टक्क्यांवर असून, गेल्या ११८ दिवसांपासून तो ३ टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर १.४८ टक्के इतका नोंदवला गेला आहे. हा दर गेल्या ५२ दिवसांपासून ३ टक्क्यांच्या खाली आणि आता सलग १३५ दिवस ५ टक्क्यांच्या खाली राहिला आहे.

4 comments