रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २१ ऑक्टोबर) करोनाचे नवे २३ रुग्ण आढळले, तर ४६ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात आज तीन करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या आता २५४ आहे.
जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार, आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत नवे २३ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार ७७४ झाली आहे. आज ४६ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ५३ झाली आहे. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.५५ आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ११०२ पैकी १०८८ अहवाल निगेटिव्ह, तर १४ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ७६५ नमुन्यांपैकी ७५६ अहवाल निगेटिव्ह, तर ९ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ९४ हजार ५४५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज २५४ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले १५३, तर लक्षणे असलेले १०१ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १३८ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात ११६ जण आहेत. आज एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले १५, डीसीएचसीमधील ४९, तर डीसीएचमध्ये ५२ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ४७ जण ऑक्सिजनवर, १३ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
यापूर्वीच्या एका आणि आजच्या दोन अशा तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ४.८७ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१३ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.७९ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४६७ झाली आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१९, खेड २२६, गुहागर १७२, चिपळूण ४७६, संगमेश्वर २१७, रत्नागिरी ८२३, लांजा १३०, राजापूर १६५. (एकूण २४६७).
रत्नागिरी जिल्ह्यात उद्यासाठी (२२ ऑक्टोबर) उपलब्ध असलेल्या लसीकरण स्लॉटची माहिती
आज, २१ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ६.२० वाजता को-विन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात खालील ठिकाणी उद्या (२२ ऑक्टोबर) लसीकरणाचे स्लॉट ऑनलाइन उपलब्ध आहेत. ज्यांचं लसीकरण व्हायचं आहे, त्यांना तातडीने https://www.cowin.gov.in/ पोर्टलवर जाऊन बुकिंग करून लस घेता येईल.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय – योगा हॉल
कोविशिल्ड लस (१८+ वयोगट)
पहिल्या डोससाठी ४८, दुसऱ्या डोससाठी ४८ लशी उपलब्ध
झाडगाव अर्बन प्राथमिक आरोग्य केंद्र, रत्नागिरी (UPHC 1)
कोविशिल्ड लस (१८+ वयोगट)
पहिल्या डोससाठी ४९, दुसऱ्या डोससाठी ४७ लशी उपलब्ध
कोकणनगर अर्बन प्राथमिक आरोग्य केंद्र, रत्नागिरी (UPHC 1)
कोविशिल्ड लस (१८+ वयोगट)
पहिल्या डोससाठी ४६, दुसऱ्या डोससाठी ४५ लशी उपलब्ध
देवरुख ग्रामीण रुग्णालय
कोविशिल्ड लस (१८+ वयोगट)
पहिल्या डोससाठी ४२८, दुसऱ्या डोससाठी ४३० लशी उपलब्ध
(टीप : स्लॉट बुकिंग सुरू असल्याने वर दिलेली आकडेवारी काही मिनिटांत बदलू शकते, याची कृपया नोंद घ्यावी.)