रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनच्या पुढाकाराने रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिक कृषी पर्यटन केंद्र तसेच रिसॉर्टचालकांसाठी पर्यटनविषयक कार्यशाळा गुरुवारी (दि. २१ ऑक्टोबर) रत्नागिरीत होणार आहे.
पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हॉटेल व्यावसायिकांना या कार्यशाळेत महत्त्वाची माहिती मिळणार आहे. शासनाच्या नियमानुसार हॉटेल व्यवसायाची औद्योगिक दर्जा म्हणून नोंदणी करणे, या नोंदणीनंतर व्यवसायाला होणारे फायदे, कृषी पर्यटन केंद्रांची अधिकृत नोंदणी, शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या पर्यटनवाढविषयक धोरणाची माहिती देणे, कोकणातील पर्यटनासाठी आखलेल्या नवीन योजनांची माहिती देणे अशा विषयांवर कार्यशाळेत माहिती दिली जाणार आहे.
कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक उपसंचालक हनुमंत हेडे, पर्यटन प्रशिक्षक मनोज हाडवले, निसर्ग पर्यटन संस्थेचे संजय नाईक, रत्नागिरी हॉटेल संघटनेचे अध्यक्ष रमेश कीर, उपाध्यक्ष रवींद्र घोसाळकर, उद्योजक उदय लोध यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
रत्नागिरीत मारुती मंदिर येथील हॉटेल व्यंकटेशच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये गुरुवारी सकाळी ११ वाजता ही सशुल्क कार्यशाळा होणार आहे. जिल्ह्यातील सर्व हॉटेल व्यावसायिकांनी या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे सचिव सुनील देसाई यांनी केले आहे.

Nisarg niwara
Narbe
Anjali yedage
9323850101