सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१९ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत १६ रुग्ण करोनामुक्त झाले, तर नवे २८ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील सक्रिय म्हणजेच उपचार सुरू असलेल्या करोनाबाधितांची संख्या अद्यापही ५००च्या खाली आलेली नाही.
जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज एका दुबार लॅब तपासणीसह नवे २८ करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ८३१ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड २, दोडामार्ग ४, कणकवली ८, कुडाळ २, मालवण १, सावंतवाडी ३, वैभववाडी ५, वेंगुर्ले २, जिल्ह्याबाहेरील ०.
जिल्ह्यात सध्या ५५७ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ३५ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड २३, दोडामार्ग २३, कणकवली १२१, कुडाळ १६२, मालवण ९९, सावंतवाडी ५६, वैभववाडी १५, वेंगुर्ले ५६, जिल्ह्याबाहेरील २.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४४५ आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७८, दोडामार्ग – ४३, कणकवली – २९८, कुडाळ – २४१, मालवण – २८७, सावंतवाडी – २००, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १०७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media