मताधिकार अ‍ॅप वापरा; मताचा अधिकार बजावा

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत असलेल्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचे मतदान सात फेब्रुवारी रोजी आहे. त्यासाठी मतदारयादीतून मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ हे मोबाइल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे.

पाच फेब्रुवारीऐवजी सात फेब्रुवारीला मतदान; दुखवट्यामुळे वेळापत्रकात बदल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता पाच फेब्रुवारीऐवजी सात फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, सात फेब्रुवारीऐवजी नऊ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.