रत्नागिरी : आपल्या बोटांच्या जादूने मनामनांवर अधिराज्य गाजवणारे संवादिनीगंधर्व अर्थात पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ २१ सप्टेंबरला रत्नागिरीत एका अनोख्या कार्यक्रमाने झाला. ‘शतसंवादिनी’ या कार्यक्रमात शंभरहून अधिक हार्मोनिअम वादकांनी एकाच वेळी एकाच रंगमंचावर सादरीकरण करून गोविंदरावांना अनोखी आदरांजली वाहिली.