ठाणे : गटशेती करीत असल्यामुळे सिंचनाची व्यवस्था झाली. त्यामुळे गेल्या वर्षी भेंडी, मिरची गवार भाजीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले. याशिवाय ट्रक्टर आणि शेततळ्याचा लाभ झाल्याचे शहापूर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी जानकी तुकाराम बगळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ‘विकेल ते पिकेल’ या कृषी विभागाच्या ऑनलाइन कार्यक्रमात संवाद साधून स्पष्ट केले.