रत्नागिरी, सिंधुदुर्गात होणार नीट परीक्षेची केंद्रे

रत्नागिरी : नीट परीक्षेसाठी गोवा सेंटर निवडलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरीमधील विद्यार्थ्यांना स्वॅब चाचणीशिवाय गोवा राज्यात प्रवेश करता यावा किंवा सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये नीट परीक्षा केंद्र मिळावे, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे केली होती. त्याला यश आले असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रे सुरू होणार आहेत. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची अडचण सुटणार आहे.