वासुदेव शिवराम सावंत स्मृती जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेला रत्नागिरीत प्रारंभ

रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेची सुरुवात रत्नागिरी येथील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमीत झाली.