वासुदेव शिवराम सावंत स्मृती जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेला रत्नागिरीत प्रारंभ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेची सुरुवात रत्नागिरी येथील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमीत झाली. कै. वासुदेव शिवराम सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २१ वर्षांखालील या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचा प्रारंभ वासुदेव सावंत यांच्या कन्या अ‍ॅड. कल्पलता भिडे, शैलेश सावंत, विजय भिडे यांच्या उपस्थितीत झाला. या प्रसंगी रत्नागिरीतील, तसेच मंडणगड, चिपळूण, संगमेश्वर इत्यादी तालुक्यांतील खेळाडूंसह जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव विवेक सोहनी, आयोजक चैतन्य भिडे आदी उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील लहान वयाच्या आणि युवा खेळाडूंना क्लासिकल डाव लिहून खेळण्याची संधी मिळावी या हेतूने ही दोन दिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एकूण सहा फेऱ्यांमध्ये स्विस लीग पद्धतीने बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसार स्पर्धा घेतली जाईल. जागतिक बुद्धिबळ संघटनेचे क्लासिकल फिडे मानांकन असलेल्या जिल्ह्यातील चार खेळाडूंसह एकूण छत्तीस बुद्धिबळपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. बहुतांश ठिकाणी बुद्धिबळाच्या जलद व अतिजलद स्पर्धाच मोठ्या प्रमाणात चालू आहेत. खेळाडूंना क्लासिकल प्रकारात विचार करायला अधिक वेळ मिळतो आणि खेळ विकसित होण्यासाठी मदत होते. रत्नागिरी जिल्ह्यात क्लासिकल बुद्धिबळाचा प्रसार व्हावा, या हेतूने अशा विविध स्पर्धांचे आयोजन जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात येत आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply